Ad will apear here
Next
‘बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत’
पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणायला हवेत. आजच्या तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हा पुस्तक वाटपाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ या उपक्रमाअंतर्गत महापुरुषांची १० हजार चरित्र पुस्तके वाटण्यात आली. ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथा’तून या पुस्तकांचे वाटप सारसबाग परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी नगरसेवक महेश लडकत, सिस्टर मरिसा ए. सी., माजी नगरसेवक राहुल तुपेरे, बाळासाहेब दाभेकर, संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे, श्री आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, सचिव गिरीश शिंदे, सचिन गजरमल, गणेश आबनावे, योगेश सुपेकर, संजय पोमण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांची चरित्र पुस्तके, तसेच भारतीय राज्यघटनाही या वेळी तरुणांना वाटण्यात आली.

उपक्रमाविषयी बोलताना शशिकांत कांबळे म्हणाले, ‘बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन त्यांना अभिप्रेत समाजाची निर्मिती व्हायला हवी. याच विचारांतून यंदाच्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प आम्ही सोडला आहे. मिरणूतकीत येणाऱ्या तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZRJBN
Similar Posts
पुणे येथे ‘वाचून मोठे होऊया’ उपक्रम पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प हाती घेण्यात आला असून, या संकल्पाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे मोफत वाटप
खासदार गिरीश बापट यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शाखे तर्फे महायुतीचे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गिरीश बापट यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
वाचनातून महामानवाला आदरांजली अर्पण पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त लीड मीडियातर्फे आणि अखिल सदाशिव, शनिवार, नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती व वंदे मातरम संघटना यांच्या सहकार्याने ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही, तर वाचून साजरी करूया’ या अभिनव उपक्रमातून डॉ. बाबासाहेब
‘बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज’ पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा उत्कर्ष साधला. आपल्या विकासात शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. ‘वाचाल तर वाचाल’ हा मूलमंत्र ध्यानात घेऊन वाचन करत बाबासाहेबांचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language